देवगड तालुक्यातील साळशी गावचे सुपुत्र जेष्ठ पत्रकार राजेंद्र साळसकर,डाॅ.जनार्दन देशपांडे आणि किरण म्हात्रे आदि नॅशनल ॲवाॅर्ड- २०२१ या पुरस्काराने सन्मानित
शिरगाव / संतोष साळसकर: मुंबई येथील बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष तसेच पत्रकार राजेंद्र साळसकर व मध्य रेल्वे स्थानिय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस डाॅ.जनार्दन देशपांडे आणि डोनेट लाईफ संस्थेचे किरण म्हात्रे आदिंना बाॅम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर,महाराष्ट्र या संस्थेच्यावतीने नॅशनल ॲवाॅर्ड -२०२१ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध चितळे उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक शशिकांत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सर्व पुरस्कार विजेत्यांना नॅशनल ॲवाॅर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी त्यांच्यासोबत बाॅम्बे ब्लड ऑर्गनायझर,इंडिया या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच आयोजक विक्रमदादा यादव, माय लॅब डिस्कवरी सोल्यूशनचे संचालक श्रीकांत पाटोळे, साॅफ्टवेअर कंपनीचे सीईओ संजीव कुलकर्णी,अभिनेत्री प्रतिक्षा जाधव,डाॅ.मनोज इंगळकर,शिवकन्या श्रद्धाताई शिंदे आदि मान्यवर व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.हा पुरस्कार सोहोळा तासगाव ,सांगली येथील समृद्धी सभागृहात नुकताच संपन्न झाला.बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष तसेच पत्रकार राजेंद्र साळसकर हे नियमित रक्यदाता असून दर ३महिन्यांनी ते नियमितपणे रक्तदान करीत असतात.कोरोना संकटकाळातही त्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले आहे.तसेच कोरोनाच्या या कठिण काळात रक्तटंचाई असताना रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे.तसेच कोरोनामुळे आपल्या देशात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे, सर्वच उद्योग धंदे यासह सर्वच आर्थिक स्त्रोत बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली होती.अशा अडचणीच्या काळात सश २०२०आणि २०२१या दोन्ही वर्षी पालकांना दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना दिलासा देण्याचे कार्य केले.तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्यांचे वाटपही केले.हे सेवाकार्य करीत असताना राजेंद्र साळसकर यांना दोनदा कोरोनाची लागण झाली.त्यातून बरे झाल्यानंतरही साळसकर यांनी आपले सेवाकार्य निरंतर चालू ठेवले.राजेंद्र साळसकर यांच्या या कार्याची दखल घेऊन बाॉम्बे ब्लड ऑर्गनायझर ,इंडिया या संस्थेने त्यांना “संजीवनी पुरस्कार -२०२१ हा नॅशनल ॲवाॅर्ड देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला.तसेच मध्य रेल्वे स्थानिय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस डाॅ.जनार्दन देशपांडे यांनी कोरोना काळात रेल्वे कर्मचारी आपली सेवा अविरतपणे बजावत असताना त्यांना मास्क व सॅनिटायझर पुरवून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले तसेच रेल्वे कर्मचा-यांना हॅंड ग्लोव्हज,गम बूट यारखी सर्वसुरक्षा साधने उपलब्ध व्हावीत यासाठी वरिष्ठ अधिका-यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याचबरोबर विविध रेल्वे स्थानकावर आयोजित रक्तदान शिबिरात सक्रीय सहभाग घेऊन ते यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.तसेच बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समिती सारख्या उल्लेखनीय कार्य करणा-या संस्थांना आर्थिक सहकार्य करून त्यांचे उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला.डाॅ.देशपांडे यांनी कामगार तसेच सामाजिक क्षेत्रास दिलेल्या या योगदानाबद्दल त्यांनाही “संजीवनी पुरस्कार-२०२१ “या नॅशनल ॲवाॅर्डने सन्मानित करण्यात आले.त्याचबरोबर डोनेट लाईफ संस्थेचे किरण म्हात्रे हे नाव रक्तदान चळवळीतील एक नावाजलेले नाव असून किरण म्हात्रे हे त्यांच्या परिचयाच्या अनेक विविध संस्थांच्या माध्यमातून वर्षभर विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून मुंबईतील विविध रूग्णालयांना पुरवीत असतात.रक्तदान चळवळीत काम करणा-या कोणत्याही कार्यकर्त्याला अथवा रूग्णाच्या नातेवाईकांना रक्त उपलब्ध न झाल्यास,किरण म्हात्रे यांना संपर्क केल्यास ते त्याची लगेचच पूर्तता करतात अशी म्हात्रे यांची ख्याती आहे.कोरोना संकट काळातही किरण म्हात्रे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन शेकडो रूग्णांना त्वरित रक्तपुरवठा व्हावा यासाठी कार्यतत्परतेने आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे.किरण म्हात्रे यांच्या या कार्याची योग्य दखल घेऊन त्यांना बाॅम्बे ब्लड ऑर्गनायझर ,इंडिया या संस्थेने त्यांना ब्लड डोनर ऑर्गनायझर हा नॅशनल ॲवाॅर्ड देऊन त्यांना गौरविले आहे. बाॅम्बे ब्लड ऑर्गनायझर,इंडिया या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव यांनी या पुरस्कार सोहोळ्याबाबत माहिती देताना सांगितले की,अशाप्रकारे भव्य -दिव्य पुरस्कार सोहोळ्याचे आयोजन करण्याचे आमच्या संस्थेचे हे सहावे वर्ष असून यंदा आमच्या संस्थेने २२राज्यातील २२ संस्था ,आणि महाराष्ट्रातील १८ संस्था तसेच ५ देशातील एनजीओ व रिझर्व डोनर असे एकुण ७५ पुरस्कार देऊन रक्तदान क्षेत्रातील तसेच विविध सामाजिक कार्य करणा-या संस्था आणि कार्यकर्त्यांना सन्मानित करून त्यांचा यथोचित गौरव केला असल्याचे सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)