ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली नगरसेवक सुशांत नाईक उतरले जिल्हा बँक निवडणुकीच्या  रिंगणात.... !

कणकवली नगरसेवक सुशांत नाईक उतरले जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात.... !

प्रकाशन: 03 Dec 2021 09:38 PM
वाचन संख्या 35

ब्यूरो न्यूज/ विवेक परब: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या: निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी गुरुवारी पतसंस्था आणि कणकवली विकास सोसायटीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे श्री. नाईक यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. यावेळी त्यांच्या सोबत आदी उपस्थित होते. यावेळी आम.वैभव नाईक,बँक अध्यक्ष सतीश सावंत,संदेश पारकर,व्हिक्टर डाटन्स,बाबा आंगणे,मुरलीधर नाईक,समीर हडकर,बंडू ठाकूर,अशोक नांदोस्कर,भास्कर राणे,संकेत नाईक,भूषण परुळेकर,प्रशांत वनस्कर,श्रीकांत राणे आदी उपस्थित होते. सुशांत नाईक हे सिंधुदुर्गाच्या राजकीय क्षेत्रात सक्रिय युवा पदाधिकारी आहेत. कणकवली नगरपंचायतीवर दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. कणकवली व सिंधुदुर्गाच्या विकासासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. कणकवली शहराच्याविकासासाठी त्यांनी खासदार व आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्यानिमित्ताने आता ते सहकार क्षेत्रात सक्रिय होत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स