ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिक्षक भारती बेमुदत साखळी उपोषण.

शिक्षक भारती बेमुदत साखळी उपोषण.

प्रकाशन: 03 Dec 2021 05:01 PM
वाचन संख्या 60

ओरोस /प्रतिनिधी : केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे बाबत, खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जि.प. स्वनिधीतून गणवेश पुरवणे बाबत आदी विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हा परिषदसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. याबातचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत निवेदने व मा. शिक्षणाधिकारी जि.प. सिंधुदुर्ग यांच्याशी वेळोवेळी निवेदने व चर्चा करूनही शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत. भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही आजपर्यंत कोणत्याच प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही. शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जि.प. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हा परिषदसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.या मागण्यांमध्ये आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमाक ५ मध्ये सिंधुदुर्ग चा समावेश होण्यासाठी कार्यवाही होणेबाबत, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करणे, cmp प्रणालीद्वारे प्राथमिक शिक्षकांचे पगार करणे बाबत, वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर करणे, अंशदान हिशोब तक्त्यातील तफावत दूर करणे व dcps कपात रक्कम व सहाव्या वेतन आयोगातील हप्ते भविष्य निर्वाह खाती वर्ग करणे, अभावीत पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया त्वरित राबवण्यात येऊन पदवीधर , केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे त्वरित भरण्या बाबत, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे बाबत, वेतन निश्चितीमधील त्रुटी दूर करून प्रस्ताव मंजूर करणे बाबत, समग्र शिक्षा अभियानातून विशेष दुरुस्ती अनुदान मंजूर केलेल्या शाळांना दुसरा हप्ता व दुरुस्ती पूर्ण झालेल्या शाळांना अंतिम हप्ता विनाविलंब मिळावा, माध्यमिककडून प्राथमिक कडे वर्ग झालेल्या शिक्षकांच्या dcps कपाती बाबत, खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जि.प. स्वनिधीतून गणवेश पुरवणे बाबत, शासनाच्या नवीन बदली धोरणानुसार करण्यात आलेल्या सुगम व दुर्गम क्षेत्रात येणान्या शाळांची यादी प्रसिद्ध करणे बाबत, सौ. नेहा नितीन गवाणकर यांची चुकीच्या पद्धतीने कपात केलेली dcps हत्याची रक्कम व्याजासह परत मिळणे बाबत, श्री . संजय रावण कोळी यांच्या मेडिकल बिलातून नियमबाह्यरित्या कपात करण्यात आलेली व्याजाची रक्कम परत मिळणे बाबत, श्रीम.अनुजा गजेंद्र रावराणे सेवानिवृत्त शिक्षिका यांना ७ व्या वेतन आयोगातील फरक मिळणे बाबत, अर्जित रजा मंजुरी आदेश शिक्षकांना व मुख्याध्यापकांना मिळणे बाबत, १५ व्या वित्त आयोगातून शाळांची लाईट बिल भरून मिळणे बाबत, महत्त्वाचे शासकीय परिपत्रके शाळांना उपलब्ध करून देण्याबाबत, १ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वस्तीशाळा शिक्षकांना शासन सेवेत समाविष्ट करून नियुक्ती देण्यात यावी, २००१-२०२१ पर्यंतची समग्र शिक्षा उपयोगिता प्रमाणपत्रा बाबत आदी मागण्यांचा समावेश आहे. तरी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा , अशी विनंती महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, सरचिटणीस अरुण पवार, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत कराड, जिल्हा महिला अध्यक्ष आशा गुणिजन, जिल्हा महिला सचिव वैशाली मर्कळ, विश्वनाथ चव्हाण आदी शिक्षक सहभागी झाले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स