ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तरंदळे येथील श्री टेवणादेवी मंदिरात शनी.४ डिसें. ला वार्षिक जत्रोत्सव

तरंदळे येथील श्री टेवणादेवी मंदिरात शनी.४ डिसें. ला वार्षिक जत्रोत्सव

प्रकाशन: 03 Dec 2021 03:54 PM
वाचन संख्या 37

शिरगाव/संतोष साळसकर: कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील ग्रामदैवत श्री.टेवणादेवी आणि श्री वशिक मर्यादा पंचायतन जागृत मंदिरात शनी. ४ डिसें. रोजी वार्षिक जत्रोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यादिवशी दोन्ही मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम,पूजाअर्चा होणार आहे.श्री टेवणादेवी मंदिरात रात्रौ. १२ वा. श्री. सुधीर कलिंगण यांचे दशावतारी नाट्यप्रयोग,पहाटे ४ वा. देवीच्या ताटाची मिरवणूक व त्यानंतर देवीच्या ओट्या भरणे तर श्री वशिक मर्यादा पंचायतन जागृत मंदिरात रात्रौ.श्री.गणेश दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.तर सकाळी ताट फिरवणे आदि कार्यक्रम होणार आहेत.तरी या उत्सवाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे देवस्थान ट्रस्ट तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स