ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
अर्नाळा येथील राज्यस्तरीय तायक्वांदो सर्धेत सिंधुदुर्गचा संघ सहभागी
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अर्नाळा येथील राज्यस्तरीय तायक्वांदो सर्धेत सिंधुदुर्गचा संघ सहभागी

प्रकाशन: 02 Dec 2021 09:48 PM
वाचन संख्या 33

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने पालघर जिल्ह्यातील अर्नाळा येथे ३३ वी क्योरोगी व ९ वी पुमसे राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धा २ ते ४ डिसेंबर या कालावधीत होत आहे. या स्पर्धेसाठी  सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड करण्यात आली असून ते तायक्वांदो खेळाडू स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.  ही स्पर्धा क्योरोगी व पुमसे या दोन प्रकारात होणार आहे. सिंधुदुर्गचे खेळाडू या दोन्ही प्रकारात सहभागी होणार आहेत. या तायक्वांदो खेळाडूंच्या संघाच्या प्रशिक्षक म्हणून  शेवंता नाईक व जयश्री कसालकर  या काम पहाणार आहेत. तर संघ व्यवस्थापक  म्हणून ऍड.अक्षय कुळकर्णी धुरा सांभाळणार  आहेत .अर्नाळा येथील ग्रीन पॅराडाईझ रिसॉर्ट या नयनरम्य ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  स्पर्धेचे स्थानिक आयोजक  राजा मकवाना हे आहेत. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर  ,महासचिव संदीप ओंबासे , सुभाष पाटील , प्रविण बोरसे , मिलिंद पाठारे ,भास्कर करकेरा , अविनाश बारगजे ,आबा झोडगे आदींच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. ३०  जिल्ह्यातील ६५० खेळाडू ,प्रशिक्षक ,पंच , संघटना पदाधिकारी या स्पर्धेसाठी उपस्थित असणार आहेत . या स्पर्धेत सहभागी झालेला संघ पुढीलप्रमाणे आहे. मुले -सौरभ आचरेकर ,श्रेयस जाधव ,ओंकार सावंत ,अविराज खांडेकर ,अब्राहम बॅरेट ,हर्षल धुरी, संतोष पवार ,नागराज चौगुले.मुली – सेजल पाटील ,स्नेहा पाटील ,जान्हवी बाक्रे ,भाग्यश्री कसालकर ,नुरेमुबी अन्सारी ,अंगारकी राणे ,निलम सावंत यांचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदेश पारकर, उपाध्यक्षा राजश्री धुमाळे,सचिव व तायक्वांदो प्रशिक्षक भालचंद्र कुळकर्णी,कोषाध्यक्ष सुधीर राणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स