ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
फोंडाघाटचे  लोकप्रिय सात्विक-जेष्ठ तपस्वी नाना तथा मधुकर नेरूरकर यांचे देहावसान अशोक/किशोर नेरुरकर यांचे ते पिताश्री
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

फोंडाघाटचे लोकप्रिय सात्विक-जेष्ठ तपस्वी नाना तथा मधुकर नेरूरकर यांचे देहावसान अशोक/किशोर नेरुरकर यांचे ते पिताश्री

प्रकाशन: 02 Dec 2021 10:37 PM
वाचन संख्या 21

कणकवली / उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरो lचीफ) :- येथील लोकप्रिय सात्विक तपस्वी व ज्येष्ठ नागरिक नाना उर्फ मधुकर हरी नेरुळकर (९४वर्षे) यांचे, वृद्धापकाळाने राहत्या घरी रात्री ७:३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुली असा मोठा परिवार आहे. संपूर्ण जिल्ह्यात आणि ज्ञाती बांधवात ते “नाना नेरुरकर” या नावाने सुपरिचित होते. त्यांच्या निधनामुळे फोंडाघाट गावातील आबालवृद्धांशी मनमिळावू , माहितीचा खजिना, प्रेमळ, तपस्वी गमावल्याचे दुःख व्यक्त होत आहे. कला- नाट्य- संगीत- क्रिकेट आणि परोपकार यांचा नानांना व्यासंग होता. त्यांच्या म.गांधी चौकातील “सरदार विश्रांती-गृह” नावाच्या जुन्या हॉटेलच्या आठवणी-चर्चा आजही गप्पातून पेठे मध्ये ऐकायला मिळतात. हॉटेलात आलेला, प्रसंगी पैसे नसले तरी तृप्त होऊन गेला पाहिजे असा त्यांचा दंडक होता. गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांनी हे हॉटेल बंद करून निवृत्ती स्वीकारली होती. नाट्य वेडापायी “देवमाणूस” नाटकातील त्यांच्या त्याकाळी गाजलेल्या भूमिकेनंतर, त्यांची जीवनशैलीच बदलली. इतर वेळी कमरेला पंचा आणि कार्यक्रमा प्रसंगी काळी टोपी, पांढरा सदरा, हातात काठी आणि अंगावर पांढरे उपरणे असा पोशाख, त्यांनी शेवटच्या घटकेपर्यंत अंगीकारला. नाथ पै, मधु दंडवते यांच्या मुशीतून तयार झालेला समाजवाद त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात मनस्वी जोपासला.आणि आचरणातही आणला. त्यांच्या जाण्यामुळे पंचक्रोशीत तीव्र दुःख व्यक्त होत असून, सकाळी अंत्ययात्रेत पंचक्रोशीसह तालुक्यातील विविध स्तरातील लोकांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स