ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
कुडाळ शहरातील नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कुडाळ शहरातील नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

प्रकाशन: 02 Dec 2021 09:39 PM
वाचन संख्या 36

कणकवली / उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कुडाळ शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील अनेक नागरिकांनी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. कुडाळ नगरपंचायत निवडणूक होऊ घातली असून शिवसेनेत प्रवेश करून नागरिकांनी शिवसेनेची ताकद आणखी वाढविली आहे. या सर्वांचा पक्षात सन्मान ठेवला जाईल. शिवसेना पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावयाची आहे असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. यामध्ये उमर शेख,महेश कोरगावकर, बिलाल शेख, अल्लाउद्दीन शेख, सलीम मुजावर, सोहेल वाडकर, आफ्फान वाडकर, समशेर शेख, तुराब मुजावर, मुश्ताक वाडकर, आमीन शेख, मैनुद्दीन मुजावर, इम्तियाज मुजावर, इस्माईल साब बलोरळी, कमाल मोगल यांसह अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जी.प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, माजी जि.प.अध्यक्ष विकास कुडाळकर,तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे,संजय भोगटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, संदीप म्हाडेश्वर, किरण शिंदे, चेतन पडते, नितीन सावंत, कृष्णा तेली. सतीश अडुळकर,उदय मांजरेकर, सतीश कुडाळकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स