सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर30 डिसेंबर रोजी होणार मतदान आणि 31 डिसेंबरला होणार मतमोजणी..!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): बहुचर्चित व उत्कंठावर्धक अशी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकरिता ३० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज आज २९ नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक सिंधुदुर्गातील राजकारणाच्या दृष्टीने तसेच भाजपा आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकरिता ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. तर भाजपाच्या दृष्टीनेही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाचा सामना या निवडणुकीत होण्याची शक्यता असताना, भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीतील तीन पक्ष या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गेले सहा महिन्यांहून अधिक काळ रणनीती आखली जात आहे. मात्र, वारंवार निवडणुक लांबणीवर पडत असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला ताणलेली असतानाच आता अखेर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)