ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे  कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी अधिक दक्षता घ्यायचे आवाहन..!

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी अधिक दक्षता घ्यायचे आवाहन..!

प्रकाशन: 29 Nov 2021 04:47 PM
वाचन संख्या 59

ओरोस | प्रतिनिधी : कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जास्त खबरदारी घ्यावी. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला या नव्या स्ट्रेनमुळे जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करणे टाळावे. तसेच कोविडबाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यासोबत कोविडच्या उपाययोजनांबाबत व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन श्री. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदेश कांबळे आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स