सिंधुदुर्गात फक्त १९४ कर्मचारी झाले हजर….
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा होणार पगार कपात; एसटी प्रशासनाकडून कामावर हजर होण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश…
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कामगारांनी शासनामध्ये विलगीकरण करण्यासाठी संप पुकारला होता. त्यावर सरकारने पगार वाढीचा प्रस्ताव एसटी कामगारांना दिला आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामगारांना कामावर हजर होण्याची विनंती केली. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून कामगार हजर होत आहेत. आज रोजी १९४ कामगार हजर झाल्याची माहिती एसटीचे यंत्र अभियंता (चालन) रमेश कांबळे यांनी दिली सिंधुदुर्ग एसटी विभागात चालक वाहक मॅकेनिक व अन्य विभागात २१४६ कर्मचारी कार्यरत आहेत. सरकारच्या आवाहनानंतर काल १५९ कर्मचारी हजर झाले होते.तर आज १९४ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. हळूहळू सर्वच कर्मचारी कामावर हजर होतील, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करत आहोत.जास्तीत जास्त संख्येने कामावर हजर व्हावे,त्यामुळे एसटी बसेस चालू करता येतील, कर्मचारी आवाहन करुनही काम करण्यासाठी येत नाहीत.त्यांची पगार कपात होणार असल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी तातडीने हजर व्हावे असा आवाहनाचा आदेश एसटी प्रशासनाच्या वतीने रमेश कांबळे यांनी दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)