ओरोस सामाजिक न्याय भवन येथे झाले संविधानाचे वाचन..!
ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासकीय व शासकीय राजधानीमध्ये तथा जिल्ह्याच्या ठिकाणी संविधान दिनानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण उपायुक्त प्रमोद जाधव यांनी संविधानाचे महत्व विशद केले. दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सर्वांना राज्य घटनेची माहिती सांगितली. यावेळी सामाजिक न्याय भवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सोबत फोटो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)