ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवली शहराच्यावतीने मंत्री नारायण राणे यांचे पटवर्धन चौकात होणार जंगी स्वागत- समीर नलावडे

कणकवली शहराच्यावतीने मंत्री नारायण राणे यांचे पटवर्धन चौकात होणार जंगी स्वागत- समीर नलावडे

प्रकाशन: 09 Aug 2021 04:33 PM
वाचन संख्या 44


कणकवली | उमेश परब : केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्गात ​२५ ऑगस्ट रोजी सायंकाळी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कणकवली शहराच्यावतीने कणकवली पटवर्धन चौक येथे न भूतो न भविष्यती असे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कोकणचे दादा नारायण राणे यांच्या स्वागताची कणकवली नगरपंचायतच्या सत्ताधारी पदाधिकारी व नगरसेवकां​ ​तर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. आतापर्यंत कणकवलीत स्वागत सोहळा झाला नाही अशा भव्य स्वरूपात हे स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागत सोहळ्याचे नियोजन कणकवलीतील नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, यांच्यासह विषय समिती सभापती, गटनेते, भाजपा शहराध्यक्ष व शहरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून अंतिम टप्यात आल्याचे नलावडे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी देत कोकणच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला तो विश्वास येत्या काळात कणकवलीतील भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता सार्थ करून दाखविणार आहे. नारायण राणेंवर प्रेम करणारे कणकवलीतील कार्यकर्ते व जनता ही देखील यावेळी उपस्थित राहणार आहे. कणकवली नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष, गटनेते, विषय समिती सभापती, नगरसेवक व शहराध्यक्ष यांच्यावर स्वागत सोहळ्याची जबाबदारी विभागून देण्यात आली असून, कणकवली नगरीत नारायण राणे यांचे स्वागत हा क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा असेल असेही नलावडे यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स