कांदळगावात कोरोना योद्ध्यांचा झाला गौरव..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कांदळगावातील भजन प्रेमी व श्री ग्रामदेवता प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
संपूर्ण जगामध्ये हाहाःकार माजविणार्या कोरोना महामारीच्या कठीण काळात आपला जीव धोक्यात घालून समाजसेवेचे कर्तव्य निभावण्यासाठी गावामध्ये काम करणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच अन्य ठिकाणी सेवा देणारे गावातील अधिकारी कर्मचारी यांचा जेष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कांदळगावचे सुपुत्र जिल्हा ग्रामीण रुग्णालय ओरोसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश पवार, गावातील आरोग्य सेविका सौ दिव्या उमेश पांजरी, आरोग्य सेवक श्री सिद्धेश धुरी, सहाय्यक श्रीमती प्रविणा हिर्लेकर, पोलीस पाटील सौ. शितल परब, आशा सेविका सौ. स्वाती बाळकृष्ण बेलवलकर, सौ. संध्या सुनील कांदळगावकर, महावितरणचे लाईनमन श्री. मिलिंद कदम, वायरमन श्री. प्रशांत मेस्त्री, मालवण कोविड सेंटर येथे काम करणारे श्री. सुनील वसंत कदम यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ ग्रामस्थ श्री रमाकांत राजाराम पारकर, श्री. लक्ष्मण हरी राणे, श्री. सुधाकर घनश्याम राणे, श्री.अनंत बाबू परब, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. शिवराम परब, प्राथमिक शिक्षक श्री प्रशांत पारकर, श्री. ग्रामदैवत प्रासादिक भजन मंडळाचे बुवा श्री प्रविण परुळेकर, संतोष पारकर, जीवन कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रविण पारकर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)