ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उपक्रमशील शिक्षक महादेव असरोंडकर यांचा राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मान..!

उपक्रमशील शिक्षक महादेव असरोंडकर यांचा राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मान..!

प्रकाशन: 23 Nov 2021 10:56 PM
वाचन संख्या 88

मदत सामाजिक संस्था नागपूर यांच्याकडून १२ डिसेंबर रोजी होणार पुरस्कार वितरण

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : नागपूर येथील मदत सामाजिक संस्था यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार” मालवण तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस गावठणचे उपक्रमशिल पदवीधर शिक्षक श्री.महादेव आप्पा असरोंडकर यांना जाहीर झाला आहे.श्री.असरोंडकर यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन कोणत्याही प्रस्तावाशिवाय त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी होणार्‍या १९ व्या राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन पुरस्कार सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्री.असरोंडकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स