विद्यामंदिर साळशी येथे २५ नोव्हेंबरला विज्ञान प्रदर्शन व गणवेश वाटप.
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी विद्यामंदिर येथे गुरूवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता गावातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या गणवेशांचे वाटप होणार आहे.तसेच विद्यार्थी निर्मित विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उदघाटन सरपंच वैभव साळसकर,माजी प.स.सदस्य सुनील गांवकर यांच्या हस्ते होणार आहे.या प्रदर्शनाचे परीक्षण पेंढारी हायस्कुलचे सत्यपाल लाडगांवकर हे करणार आहेत.
यावेळी सकाळी वाजता शाळेच्या बोर्डाचे उदघाटन ९ :१५ वाजता विज्ञान प्रदर्शन व परीक्षण,९,३५ वा. आकाश कंदील उदघाटन,९,४५ वा. भेटकार्ड व चित्र प्रदर्शन, उदघाटन,१०वा. गणवेश वाटप हॊणार आहे.तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन सत्यवान सावंत,मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)