ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राज्यस्तरीय शूटींगबाॅल स्पर्धेत नवी मुंबई मनपा अजिंक्य..!

राज्यस्तरीय शूटींगबाॅल स्पर्धेत नवी मुंबई मनपा अजिंक्य..!

प्रकाशन: 23 Nov 2021 04:53 PM
वाचन संख्या 50

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मैदानी खेळांतील द्रोणाचार्य श्री अशोक दाभोळकर मेस्त्री यांच्या मार्गदर्शनातून झाले स्पर्धेचे आयोजन…!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कोल्हापूर जिल्ह्यातील लिडर व्हाॅलीबाॅल क्लब,औरवाड- शिरोळ येथे झालेल्या राज्यस्तरीय शुटिंगबाॅल स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालीका संघाने आय एस सी मालेगांव संघाचा दोन सेटमध्ये (१५/१० व १५/७) पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व शुटिंगबॉलचे आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


दाभोलकर यांचा इचलकरंजी, कोल्हापूरचे विद्यमान खासदार श्री. धैर्यशिल माने ह्याचा शुभहस्ते उचित सन्मान करण्यात आला.
स्पर्धेतील मैदान क्र. १ चे उदघाटन अशोक दाभोलकर यांच्या हस्ते झाले.
ह्या स्पर्धेत महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंचा समावेश असलेले ३४ संघ सहभागी झाले होते. साखळी पध्दतीने आठ गटात सामने खेळविले गेले. दोन दिवस अतिशय रंगतदार झालेल्या ह्या स्पर्धेत अंतिम फेरी संपेपर्यंत एकूण ४९ सामने खेळविले गेले तसेच दोन्ही सेमी व फायनल बेस्ट ऑफ थ्री सेट खेळविण्यात आल्या.
पावसाने वारंवार व्यत्यय आणूनही अनुभवी जेष्ठ राष्ट्रीय खेळाडू श्री. अजिज पटेल, नबी पटेल ह्यांच्या नेतृत्वाखाली सर्व मान्यवर सदस्यानी अजोड मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वी केली.
अतिशय रंगतदारपणे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नवी मुंबई महानगरपालीका संघाने मालेगांव संघाचा दोन सेटमध्ये पराभव करीत ही स्पर्धा जिंकली तर सातारा व जामनेर संघाला अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या क्रमांकवर समाधान मानावे लागले.
उपउपांत्य फेरीत पराभूत झालेल्या नवजीवन मालेगांव, युथ फाऊंडेशन मालेगांव, खानापूर तसेच मालेगांव (खुर्शिद) ह्या संघानाही रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच मालीकावीर अन्सारी ईस्तियाक ( नवी मुंबई. मनपा), सामनावीर वकार अंजूम ( ISC मालेगांव), बेस्ट शूटर:- सोएब शेख ( जामनेर), बेस्ट डिफेन्सर:- मुब्बशीर अन्सारी ( नवी मुंबई मनपा) ह्यांची निवड झाली.
स्पर्धा नियंत्रक म्हणून जेष्ठ राष्ट्रीय खेळाडू सर्वश्री. पांडुरंग कदम (सांगली) व लक्ष्मण साठे(कोल्हापूर) ह्यांनी काम पाहीले. पंच म्हणून राष्ट्रीय पंच सर्वश्री. रमेश पवार (सांगली), अलिशा फकीरा (सांगली) व विजय गोंधळी ( मुंबई) व गुणलेखक म्हणून अरुण पाटील, शुभम पाटील, धीरज पाटील व शहानवाझ मोमिन ह्यानी काम पाहीले.तांत्रिक समितीवर सर्वश्री. अजिज पटेल, नबी पटेल व शकील पिरजादे ह्यांनी काम पाहीले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.


श्री अशोक दाभोळकर मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखालील आयोजित या स्पर्धेतील तंत्रशुद्धता आणि खिलाडुवृत्ती ही अतिशय आदर्श ठरली असाच स्पर्धेदरम्यान क्रिडाप्रेमींचा व खेळाडूंचाही सूर होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स