ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राज्यस्तरीय जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग संपर्कप्रमुखपदी पत्रकार सतीश साटम यांची निवड..!

राज्यस्तरीय जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग संपर्कप्रमुखपदी पत्रकार सतीश साटम यांची निवड..!

प्रकाशन: 23 Nov 2021 08:02 PM
वाचन संख्या 194

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडवली गांवचे सुपुत्र

शिरगांव /संतोष साळसकर : आडवलीचे सुपुत्र आणि ठाणे येथील पत्रकार सतीश अंकुश साटम यांची राज्यस्तरीय जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग संपर्क प्रमुखपदी नेमणुक प्रदेश अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी नुकतीच, ठाणे येथे संपन्न झालेल्या बैठकीत जाहीर केली.
ठाणे, पालघर व मुंबई येथे शिक्षण, आरोग्य आणि क्रिडा आदी व्यक्तीविकासात्मक सामाजीक प्रश्नांना आपल्या लेखणीव्दारे वाचा फोडुन समाजाला न्याय मिळवुन दिला. यांमुळे जर्नलिस्ट युनीयनने सतीश साटम यांना युनियनच्या कार्यकरणीत पद दिले. त्यामुळे अधिक जोमाने साटम यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात सभा घेऊन युनियनच्या पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने, पत्रकारांच्या विविध समस्या व प्रश्न शासन दरबारी नेऊन न्याय मिळवून दिला. या युनीयनचा, सिंधुदुर्गातील पत्रकारांना फायदा मिळावा व सर्व पत्रकारांना योग्य न्याय मिळावा म्हणुन सिंधुदुर्गात सभा घेऊन ग्रामीण व शहरी पत्रकारांना मार्गदर्शन करुन संघटणा मजबुत करण्याचा, साप्ताहिक निर्भय शासन चे संपादक सतीश साटम यांचा मानस असल्याचे म्हणाले.
यावेळी राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी प्रवीण दवणे, प्रो हेमंत सामंत, के रवि दादा, राजेश जाधव, मोहिते, व यूनिट अध्यक्ष विजय मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स