ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पंचायत समितीच्या इमारतीतुन लोकाभिमुख कामे व्हावीत : केंद्रीय मंत्री नारायण राणे

पंचायत समितीच्या इमारतीतुन लोकाभिमुख कामे व्हावीत : केंद्रीय मंत्री नारायण राणे

प्रकाशन: 23 Nov 2021 01:30 PM
वाचन संख्या 86

कणकवली नूतन पंचायत समिती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

कणकवली | उमेश परब : कणकवलीतील पंचायत समितिच्या नूतन इमारतीच्या आतील कारभार सुबक झाला पाहिजे,तेव्हाच इमारत सुंदर दिसेल.नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत,त्यासाठी ही इमारत आहे.यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले,त्यामुळेच पदाधिकारी त्या पद्धतीने काम करा.कणकवलीत कुठलेही मतभेद नाहीत.विकासाची जाण जाणीव झाल्याशिवाय कामे होत नाही.कणकवली नूतन पंचायत समितीच्या इमारतीतुन लोकाभिमुख कामे करा,असा सल्ला पदाधिकऱ्यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्या.कणकवली पंचायत समिती इमारत लोकार्पण सोहळ्यानंतर ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी खा. निलेश राणे, आ.नितेश राणे ,जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत,सभापती मनोज रावराणे,सभापती अंकुश जाधव,संजय देसाई,श्रीया सावंत,माजी आ.राजन तेली,माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम,संतोष कानडे,दिलीप तळेकर,सुजाता हळदीवे, उपसभापती प्रकाश पारकर,मिलींद मेस्त्री,तुळशीदास रावराणे,महेश गुरव,हर्षदा वाळके,गणेश तांबे,प्रज्ञा ढवण आदींसह पंचायत समिती सदस्य व तालुक्यातील सरपंच,उपसरंपच, पदाधिकारी उपस्थित होते.
विकासाचा अभ्यास करावा,वेळ मिळेल तेव्हा वाचनाला बसला पाहिजे.पंचायत समितीचे सदस्य व पदाधिकारी असतील तर काम चांगले घडेल.विलासराव देशमुख यांची बसभापती ते मुख्यमंत्री कशी वाटचाल वाटते?तसंच तुमची वाटचाल असावी.पक्षाची जाणीव ठेवली पाहिजे,भाजपाची सत्ता असलेली ही पंचायत समिती आहे.लोकांचे आशीर्वाद मिळवून काम करा.विकासाची संधी मिळाल्यास मी जनतेचा सेवक समजून काम करत राहणार असल्याचे ना.राणे यांनी सांगितले.माजी खा.निलेश राणे म्हणाले,माझ्या भावाचा मतदार संघ आहे,भाऊ म्हणुन नव्हे,तर नितेश बद्दल मला अभिमान आहे.कणकवली पंचायत समिती सारखे उपक्रम कोण घेत नाही. काम करायचे असेल,तर कणकवली पंचायत समिती सारखं करा.सगळ्याच बाबतीत कणकवली आघाडीवर आहे.पालकमंत्र्यांनी किमान आमच्या सारखे काम करावे.कणकवली आमच्या राजकारणाचे नाक आहे, नितेश राणे असताना घाबरु नका.दर्जेदार काम केले जाईल.अजित पवार हे अर्थमंत्री असल्याने अपेक्षा ठेवावी का?असा सवालहीआ.नितेश राणे म्हणाले,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आभार मानतो,त्यांनी वेळ दिला आहे.हा प्रवास एवढा सोपा नव्हता,२०१७ मध्ये ऐतिहासिक निकाल दिला,१६ सदस्य निवडुन दिले,राज्यात गावठी आठवडा बाजार सुरु केला,त्याचे राज्यात मॉडेल बनले आहे.वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग ही पंचायत समिती कार्य करत आहे.पालकमंत्र्यांनी फर्मान काढले,अधिकाऱ्यांनी जाऊ नये,सत्ताधारी घाणेरडे राजकारण केले जात आहे.निधी चांगला द्या,नेहमी काळ्या मांजारासारखे आडवे जाण्यापेक्षा मदत करा.सामाजिक, विधायक कामे करा,तालुक्यातील जनतेला विश्वास नाही देतो,जनतेची काळजी आम्ही घेऊ,येत्या निवडणुकीत राणेंच्या विचाराचे लोकांवर जनता विश्वास ठेवेल.राजन तेली म्हणाले,राणे पालकमंत्री होते, तेव्हा रस्ते आणि आताची परिस्थिती काय आहे?आताचे पालकमंत्री काय करताहेत?केंद्र सरकारच्या कामाचे कौतुक झाले पाहिजे.घाणेरडे राजकारण शिवसेनेनं सोडावे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती मनोज रावराणे तर उपसभापती प्रकाश पारकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स