ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ऑनलाईन युगातील पिढीने लोककलाकारांच्या योगदानाची व कलेची जाणीव राखावी : जि.प.अध्यक्ष संजना सावंत.

ऑनलाईन युगातील पिढीने लोककलाकारांच्या योगदानाची व कलेची जाणीव राखावी : जि.प.अध्यक्ष संजना सावंत.

प्रकाशन: 23 Nov 2021 11:55 AM
वाचन संख्या 66

पंचायत समिती मालवणच्या लोककला महोत्सव http://localhost/news/public/uploads/2021 चे उद्घाटन.

24 नोव्हेंबरपर्यंत चालणार तीन दिवसीय महोत्सव.

पद्मश्री परशुराम गंगावणे यांची विशेष उपस्थिती..

मालवण | वैभव माणगांवकर : आधुनीक जगात व काळात हरवलेली तरुण पिढी लोककलाकारांना विसरत चालली आहे ही एक खेदाची गोष्ट आहे. लोकांचे यथोचित मनोरंजन करण्याची क्षमता फक्त अस्सल कलाकारांत असते. लोककला जोपासणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्याचा मालवण पंचायत समितीचा उपक्रम प्रशंसनीय आहे.जिल्हा परिषद लोककलाकारांच्या नेहमीच सोबत राहील असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी येथे बोलताना केले.
मालवण पंचायत समिती तर्फे आयोजित लोककला महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. संजना सावंत यांच्या हस्ते आणि पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जि. प. चे वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जि. प. सदस्य संतोष साटविलकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, भाजपचे बाबा परब, पं. स. सदस्य अशोक बागवे, मनीषा वराडकर, ज्येष्ठ दशावतार कलावंत ओमप्रकाश चव्हाण आदी व इतर उपस्थित होते. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे व ओमप्रकाश चव्हाण यांच्यासह पुरुषोत्तम खेडेकर (आमडोस), सुधीर तांडेल (वराड), सुहास माळकर (कोळंब), गुणाजी घाडीगांवकर (ओवळीये) विनायक येरागी (दांडी), विनांद परब (दांडी), जीजी चोडणेकर (देवबाग), यशवंत घाडी (चिंदर), विठ्ठल तळवडेकर (मठ बुद्रुक), शामसुंदर आचरेकर (पेंडूर), तुकाराम काणे परब (ढोलकीपटू), विठ्ठल गुरव (आचरा), विलास वालावलकर (देवबाग), राजेंद्र कोदे (कांदळगाव), अरुण पालकर (सुकळवाड), लक्ष्मण दळवी (तळगाव), भालचंद्र केळुसकर (वायरी), आत्माराम पालव (सुकळवाड) आदी दशावतार व भजनी कलाकारांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.


यावेळी अजिंक्य पाताडे यांनी प्रास्ताविक करताना ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लोककला व त्यातील कलाकार यांचा यथोचित सन्मान करण्याच्या दृष्टीने व जुन्या वृद्ध कलाकारांना पुन्हा एकदा रंगमंचावर आपली कला सादर करता यावी यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे सांगितले. कलाकारांची शासन दफ्तरी नोंद करण्याबरोबरच वृद्ध कलाकारांना मानधन मिळवून देण्यासाठी पंचायत समिती प्रयत्नशील असल्याचेही पाताडे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले, गेली ५० वर्षे आपण कळसूत्री बाहुल्यांची कला जोपासली. लोकांचे मनोरंजन करतानाच शासनाचे जनजागृती कार्यक्रमही या कलेद्वारे सादर करत लोकांमध्ये जागृती केली. आज मला पद्मश्री मिळाल्याने या निर्जीव असलेल्या बाहुल्यांमध्ये जणू सजीवत्व आले आहे. तर मालवण पंचायत समितीने लोककलाकारांचा सन्मान केल्याने, त्यांना व्यासपीठ मिळवून दिल्याने लोककलांना पुन्हा राजाश्रय मिळाल्यासारखे वाटत आहे, असेही गंगावणे म्हणाले. यावेळी ओमप्रकाश चव्हाण, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव , वृत्तनिवेदक ऋषी देसाई, महेंद्र चव्हाण, भजनसम्राट भालचंद्र केळुस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले.


या महोत्सवात वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांचा तसेच जिल्ह्यातून पुणे येथे प्रथम आंबा पेटी पाठविणारे आंबा व्यावसायिक उत्तम फोंडेकर यांचाही सत्कार करण्यात आला. आभार राजू परुळेकर यांनी मानले तर सुत्रसंचालन कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी केले. यावेळी ओमप्रकाश चव्हाण यांचा एकपात्री प्रयोग तसेच पंचायत समितीतर्फे दिंडी नृत्य सादर झाले. तर दिवसभर विविध लोककलाकारांचे कार्यक्रम सादर झाले. हा लोककला महोत्सव दि. २४ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.
लोककलाकारांना मिळत असलेले प्रोत्साहन पाहून काही ज्येष्ठ लोककलावंत आनंदाने भावूक झाल्याचेही दृष्य महोत्सव परिसरात पहायला मिळाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स