ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हिंदळे गांवातील काळभैरव मंदिर येथील 'देवदिवाळी' उत्सवाचा ३० नोव्हेंबरला होणार प्रारंभ..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हिंदळे गांवातील काळभैरव मंदिर येथील 'देवदिवाळी' उत्सवाचा ३० नोव्हेंबरला होणार प्रारंभ..!

प्रकाशन: 22 Nov 2021 07:57 PM
वाचन संख्या 97

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील हिंदळे येथील श्री काळभैरव मंदिर येथे २६ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरव जयंती उत्सवाचे तसेच दिनांक ३० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत देव दीपावली वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ते दु. १ वाजेपर्यंत लघुरुद्र जप.,रात्री ९.३० वाजता रंगनटराज, हिंदळे यांचा श्री श्रीकृष्ण अध्याय ( हा श्री कृष्णा अवतारावरील आधारित कार्यक्रम),शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दु. १ वाजेपर्यंत लघुरुद्र स्वाहाकार,दुपारी १वाजल्यापासून ३ वाजेपर्यंत महाप्रसाद,दुपारी १ ते संध्या ७.३० पर्यंत स्थानिक बुवांची भजने,रात्रौ १० वाजता पारंपारिक डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा श्री संदीप लोके. (श्री वरची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगड ) विरुद्ध बुवा श्री प्रमोद धुरी. (श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) प्रासादिक भजन मंडळ विलेपार्ले मुंबई) यांच्यात होणार आहे.
देव दीपावली वार्षिक महोत्सव ३० नोव्हेंबर २०२१ ते ४ डिसेंबर २०२१ रोजी.संध्या. डाळप इ.रात्रौ पुराण वाचन पालखी व त्यानंतर कीर्तन. कीर्तनकार ह.भ.प. कंकाद्रीक लोणे हिंदळे मोर्वे. ५ डिसेंबर रोजी ओटी भरणे चालू संध्या ७ वा. उत्सवाची सांगता. तरी सदर उत्सवास उपस्थित राहून भाविकांनी तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री काळभैरव देवस्थान कमिटी हिंदळे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स