राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बांद्यातील प्रणव नाईकची निवड...!
बांदा | राकेश परब : खेमराज मेमोरियल इग्लिश स्कुल बांदा या प्रशालेत इयत्ता दहावी मध्ये शिकणारा निगुडेसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रणव नाईक याची राष्ट्रीय बाल विज्ञान येथे घेण्यात आलेल्या विज्ञान विषयक प्रकल्प सादरीकरण स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.९८ स्पर्धकांमधुन१५ विद्यार्थी निवडले गेले त्या १५ मध्ये प्रणव नाईक याची निवड झाली आहे.त्याला शिक्षीका स्नेहा दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.त्याची निवड झाल्याने त्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर, प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरस्कर,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडून अभिनंदन करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)