ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नगरपंचायतीच्या अग्निशमन, सफाई कामगारांचा अनाम प्रेम संस्थेकडून सत्कार.....

नगरपंचायतीच्या अग्निशमन, सफाई कामगारांचा अनाम प्रेम संस्थेकडून सत्कार.....

प्रकाशन: 20 Nov 2021 04:55 PM
वाचन संख्या 91

समाजातील अनेक दुर्लक्षित घटकांसाठी संस्था कार्यरत

कणकवली / उमेश परब / (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ):अनाम प्रेम या भक्तिमार्गात कार्यरत असणाऱ्या संस्थेमार्फत गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून कणकवती नगरपंचायत मधीत अग्नीशमन व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. समाजातील विविध घटकांचे या संस्थेमार्फत नेहमीच कौतुक केले जाते. समाजात अनेक घटक आपआपल्यापरिने काम करत असतात. त्यामुळे या दुर्लक्षित राहिलेत्या घटकांचा गौरव व्हावा हा उदात्त हेतू ठेवून ही संस्था प्रसिद्धी च्या झोतात न राहता आपले काम करत असते. यापूर्वी देखील अनेकदा एसटी वाहक चालक यांच्यासोबतच पोस्ट डे, पोलीस डे, नर्स डे या संस्थेकडून कर्मचाऱ्यांचा गौरव करत साजरे केले जातात. कणकवली नगरपंचायत मधीत अग्रीशमन व सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरव करताना अग्निशामन विभागाच्या टीम लीडर ला अग्निशमन विभागातील कामकाज व या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जुन्या अनुभवी लोकांचे अनुभव गाठीशी असावे त्याकरिता एक पुस्तकही भेट देण्यात आले. तसेच नरक चतुर्दशी दिवशी रेल्वेच्या मोटरमन यांनाही फराळ देऊन त्यांचा सत्कार या संस्थेमार्फत केला जातो. तसेच खंडेनवमी दिवशी रेल्वे रुळाची पूजा रेल्वे गॅंग मन यांचा सत्कार करून ही संस्था समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचत असते. नुकतेच सीमेवर कार्यरत असणाऱ्या देशाचे रक्षण करणाच्या सैनिकांकरिता 16 हजार फराळाचे बोस या संस्थेच्या माध्यमातून पाठविण्यात आले.यावेळी कणकवलीतील या संस्थेशी जोडले गेलेले नंदू टिकले, संदीप खानोलकर, अविनाश तिरोडकर नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक बंडू गांगण, मनोज धुमाळे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स