ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कळसुली ग्रामस्थांचा जनउद्रेक.....!

कळसुली ग्रामस्थांचा जनउद्रेक.....!

प्रकाशन: 20 Nov 2021 04:18 PM
वाचन संख्या 193

त्या डाॅक्टरांवर कारवाईची केली मागणी…!

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ): कणकवली कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरच्या दिरंगाईमुळे वैशाली गणपत परब यांना आपला प्राण गमवावा लागला. अश्या घटना कळसुली गावात वारंवार घडत आहेत. ही सलग तिसरी घटना असून अशा कामचुकार डॉक्टरांवर कारवाई कारा अशी मागणी कळसुली ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.पोळ यांना निवेदन देऊन केली आहे. कळसुली परबवाडी येथील वैशाली गणपत परब यांना त्रास होऊ लागल्याने ग्रामस्थांनी लागलीच कळसुली आरोग्य केंद्रात धाव घेतली मात्र त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर उपस्थित नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांना कणकवली येथे उपचारसाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र त्याच दरम्यान वैशाली परब यांची प्राणज्योत मालवली होती. ही सलग तिसरी घटना आल्याने कळसुली ग्रामस्थांनी वैद्यकीय तालुका अधिकारी डॉ. पोळ यांना घेराव घालत अशी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरावर योग्य ती कारवाई करा अन्यथा जनउद्रेकाला आपण जबाबदार असाल अशा आशयाचे पत्र देत इशारा दिला आहे. यावर आपण योग्य तो न्याय ग्रामस्थांना देऊ असा विश्वास यावेळी डॉ. पोळ यांनी उपस्थितांना दिला. यावेळी कळसुली ग्रामपंचायत सरपंच साक्षी परब, तंटामुक्ती अध्यक्ष चंदू परब, रुपेश आंडोस्कर,सुशांत दळवी,पोलीस पाटील महेश केसरकर, मधुकर चव्हाण, रुजाय फर्नांडिस, गुणाजी परब, मोहन दळवी, विजय परब, लक्ष्मण परब, नंदू परब, गुणाजी परब, सत्यवान परब, नंदकिशोर सुद्रीक, किशोर घाडीगांवकर, सत्यवान परब, आदींसह कळसुली गावांतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स