ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कणकवलीच्या साहित्यिक सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवलीच्या साहित्यिक सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर..!

प्रकाशन: 19 Nov 2021 08:58 PM
वाचन संख्या 197

डाॅ.श्रीपाल व ललिता सबनीस ठरले राष्ट्रीय सावित्रीज्योती  पुरस्काराचे मानकरी…!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील समाज जाणिवेसोबत साहित्यिकदृष्ट्या सक्षम व प्रतिभावंत  कवयित्री, कथाकार सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सरिता पवार या मागील २२ वर्षे साहित्यलेखन करत आहेत. त्यांचे साहित्य राज्यातील अनेक प्रस्थापित मासिके तसेच दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले आहे. सरिता पवार यांच्या अनेक कविता आणि कथांना अनेक राज्यस्तरीय, आंतरराज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्राथमिक शिक्षिका असलेल्या सरिता पवार यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुकरणीय कामगिरीची दखल घेत कुठल्याही प्रस्तावाशिवाय विविध संस्थांनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आले आहे. अद्वैत फाउंडेशनच्या माध्यमातून साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून व्यक्तीमत्व विकास व संस्कार शिबीर सिंधुदुर्गात त्या आयोजित करतात. सिंधुदुर्गातील सध्याच्या साहित्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देत असलेल्या समाज साहित्य संघटनेच्या सचिव म्हणून त्या काम पाहतात. सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक कार्यात त्या नेहमी अग्रेसर असतात. विविध सामाजिक संस्थांशी त्या सक्रियपणे जोडल्या गेलेल्या आहेत. श्रीमती पवार यांच्या साहित्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सहयोगाने त्यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या २७ नोव्हेंबर रोजी श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कवयित्री सरिता पवार यांच्यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील कर्तव्यसंपन्न अशा एकूण १५ महिलांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. यांत मंदाकिनी रोकडे (पुणे), वैशाली मोहिते (पुणे), मधुराणी बनसोड (वाशीम), शिल्पा परुळेकर पै (वसई), अक्षदा देशपांडे (मुंबई), दीपिका सुतार (सिंधुदुर्ग), चंदना सोमाणी (पुणे), माधुरी चौधरी (औरंगाबाद), शरयू पवार (पुणे), जयश्री पाटकर (अमरावती), डॉ. नीलम जेजुरकर (राजगुरूनगर), डॉ. सुनीता खेडकर (पुणे), पौर्णिमा खांबेटे (पुणे), मनीषा शिंदे पाटील (पलूस, सांगली) यांचा समावेश आहे.
या सोहळ्यात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. या सोहळ्याला डॉ. विजय ताम्हाणे, कवी चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. प्रशांत रोकडे उपस्थित राहणार आहेत.
या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल  सरिता पवार यांचे राज्यभरातून  अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स