सावंतवाडी तालुक्यातील विलवडे माऊली देवीचा जत्रोत्सव २५ नोव्हेंबर रोजी.
बांदा | राकेश परब : विलवडे येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी साजरा होणार आहे. शासनाचे ठरवून दिलेल्या कोरोनाचे सर्व नियम पाळून हा जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. रात्री मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन, करुन रांगेत देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)