निगुडे येथे शेतीदिन कार्यशाळा संपन्न
बांदा | राकेश परब : निगुडे येथे शेतीदिन कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी श्री विश्वटी समूह व संतोषी समूह च्या शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी निगुडे गावचे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, कृषी पर्यवेक्षक बी.गाड उपस्थित होते. कृषी सहाय्यक श्वेता बेलगुंदकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक बी. गाड यांनी श्री पद्धतीने भात शेती कशी करावी, भाताचे प्रकार त्या संबंधी माहिती, वायंगणी शेती यावेळी करताना प्रात्यक्षिक करून यावेळी निगुडे येथे शेती करावयाची आहे त्याच प्रकारे शेतकरी अपघात विमा, फळबाग इन्शुरन्स, ऑरगॅनिक खते या सर्व गोष्टीची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे सर्वांनी शेती करावी असे मोलाचे मार्गदर्शन गाड यांनी केले. आज निगुडे येथील महिला “पिकेल ते विकेल” या अंतर्गत आपला स्टॉल लावून व्यवसाय करतात ग्रामपंचायतीमार्फत जे काय सहकार्य हवे असेल ते आम्ही आपणास करण्यास तयार आहोत असे सरपंच समिर गावडे व उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी बोलताना सांगितले. यावेळी कृषी सहाय्यक श्वेता बेळगुंदकर, श्वेता सावंत, सुषमा देसाई, शेतीमित्र संजना गावडे, ग्रामपंचायत सदस्या समीक्षा गावडे, सी. आर. पी. ममता नाईक, आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर, अंगणवाडी सेविका प्रियंका राणे, दिपाली निगुडकर, शुभदा गावडे, सुरेखा राणे, गंधाली निगुडकर, लक्ष्मी पोखरे, संजना सावळ, ममता गावडे, सुमित्रा शेलटे, सुचिता नाईक, सुनिता केणी, स्नेहलता तुळसकर तसेच विश्वाटी समूह व संतोषी समूह गटाच्या महिला उपस्थित होत्या. यावेळी कृषी सहाय्यक श्वेता बेळगुंदकर यांनी आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)