ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मंच डिजिटल…स्थिती क्रिटिकल... परंतु आभाळमायाचे सदस्य उद्देशामध्ये अविचल..!(विशेष वृत्त)

मंच डिजिटल…स्थिती क्रिटिकल... परंतु आभाळमायाचे सदस्य उद्देशामध्ये अविचल..!(विशेष वृत्त)

प्रकाशन: 18 Nov 2021 06:03 PM
वाचन संख्या 124

कॅन्सर ग्रस्त अक्षय फाटकच्या मदतीला धावला आभाळमाया वाॅटस् अप गृप

चौके | अमोल गोसावी (विशेष वृत्त): डिजिटायझेशनच्या युगामध्ये शैक्षणिक आणि इतर व्यावसायिक सजगतेसोबतच आरोग्यविषयक समाज जाणिवाही सजग होत असतात. डिजिटायझेशन किंवा डिजिटल मंचाचा उपयोग आरोग्यविषयक गरजूंसाठीच्या आर्थिक मदतींसाठीही होऊ शकतो.
वाॅटस् अप गृपवर विविध संभाषणे, मनोरंजन हे होतच असते परंतु तोच समूह समाजभान जपायची इच्छा धरुन निर्माण झालेला असेल व या ना त्या प्रकारे समाजातील आर्थिक गरजांसाठी पुढाकार घ्यायचा उद्देशही ठेवतो….तो समूह “आभाळमाया” बनतो..शब्दशःसुद्धा आणि कृतीने सुद्धा…आभाळामायेचा.
मालवण तालुक्यातील वराड सावरवाड गावचा एक तरुण अक्षय श्रीकृष्ण फाटक हा गेल्या दोन महिन्यांपासून ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या अक्षय फाटक या युवकाला वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. दोन महिन्यांपूर्वी गोवा बांबुळी येथे या आजाराचे निदान झाल्यानंतर या कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याला उपचारासाठी सर्वात अगोदर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर त्यानंतर आता नानावटी रुग्णालयात त्याला हलवण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचारासाठी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ६० लाखांची गरज आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील या मुलासाठी एवढी रक्कम उभी करणे ही खरेच अशक्य परिस्थितीच आहे. त्यानंतर समाज माध्यमांतून आवाहन करून हा निधी जमा करण्याचं ठरविण्यात आलं. ही बाब वराड – कट्टा येथे नव्यानेच सुरू झालेल्या “आभाळमाया” या व्हाट्सएप गृपच्या सदस्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर या ग्रुपचे प्रबंधक राकेश डगरे यांनी या ग्रुपवरून १९ ऑक्टोबरला सदस्यांना मदतीचे आवाहन केले. अवघ्या एका महिन्याच्या आत अक्षयच्या मदतीसाठी तब्बल २ लाख ४२ हजार १९० रुपयांचा निधी जमा करून या रक्कमेचा धनादेश सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी अक्षयचे वडील श्रीकृष्ण फाटक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी आभाळमाया गृपचे राकेश डगरे , गौरव हिर्लेकर , जगदीश परब, रामचंद्र आंबेरकर , आनंद आचरेकर, युवराज ढोलम , कल्पेश ढोलम , दादा वराडकर , नितीन शेट्ये, दिपक कवठणकर जयंत जावडेकर, परमानंद वेंगुर्लेकर, प्रदिप मिठबावकर , प्रविण मिठबावकर , अमित चव्हाण , समीर मुंबरकर , समीर रावले, श्रद्धा सुनिल नाईक , राहुल डगरे , शुभम मसुरकर. आदी सदस्य उपस्थित होते
अद्यापही दात्यांची गरज !
अक्षयच्या उपचारासाठी तब्बल ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या निधीची पूर्तता करण्यासाठी समाजातील विविध घटकांतून मदतीचं आवाहन करण्यात आलंय. अक्षयला उपचारासाठी अजून मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. त्यामुळे अजूनही कोणाला अक्षयला मदत करायची असेल तर “आभाळमाया वाॅटस् अप गृपचे ऍडमीन” श्री.राकेश डगरे (मो.नं. 09987762896) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आभाळमाया गृपतर्फे करण्यात आले आहे.
आभाळमाया गृपच्या या समाजोपयोगी कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
औषधापचारांअभावी आबाळ होण्याची शक्यता निर्माण झालेल्या अक्षयला आभाळमाया वाॅटस अप गृपच्या रुपात एक आधार मिळतोय असेच म्हणता येईल.
जास्तीतजास्त लोकांनी अक्षयच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असेच प्रेरणादायक काम या आभाळमाया वाॅटस अप गृपने केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स