ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आचरा गांवच्या व्यापाऱ्यांची विद्युत मंडळ कार्यालयावर धडक…!

आचरा गांवच्या व्यापाऱ्यांची विद्युत मंडळ कार्यालयावर धडक…!

प्रकाशन: 18 Nov 2021 05:39 PM
वाचन संख्या 107

अनियमित वीज पुरवठ्याबद्दल अधिकार्यांना विचारला जाब..!

चिंदर | विवेक परब : आचरा येथील विजेच्या खेळखंडोब्याने आचरावासीय त्रस्त आहेत.
गेले काही दिवस अनियमित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आचरा विद्युतमंडळाच्ये कार्यालयावरच थेट जाऊन अधिकाऱ्यांकडे कारणमिमांसा करत त्यांना फैलावर घेतले. याबाबत आचरा सबस्टेशन फिडरमध्ये झालेल्या बिघाडामुळे विद्यूत समस्या उद्भवत असून शनिवारी आवश्यक ते सामान उपलब्ध झाल्यावर बिघाड दुरुस्त करण्यात येणार असल्याचे अभियंता पाटील यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत समस्या दूर न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा व्यापारी वर्गाकडून देण्यात आला आहे.
दिवाळीपासूनच आचरा येथे विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. मागील रविवारी ऐन आठवडा बाजारा दिवशीच वीज पुरवठा खंडित झाला होता.तरीही व्यापारी वर्गाने संयमाने घेत विद्युत मंडळाविरोधात सामंजस्याची भावना घेतली होती. मात्र तरीही खंडित वीजेचा त्रास सुरुच राहिल्याने संतप्त आचरा व्यापारी वर्गाने जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस, संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी विद्युत मंडळ कार्यालयावर धडक देत येथील सहाय्यक अभियंता पाटील यांना जाब विचारला. या वेळी त्यांच्या सोबत व्यापारी संघटनेचे प्रफुल्ल नलावडे, प्रफुल्ल घाडी,चंदू कदम, निखिल ढेकणे, पंकज आचरेकर, दाजी आचरेकर, सागर राठवड,गोसावी, शरद देसाई,अवी परब,यांसह अन्य व्यापारी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित व्यापारी पदाधिकारयांनी आचरा बाजारपेठ लाईनला नेहमी उद्भवणाऱ्या समस्यांचा पाढाच वीज मंडळ अधिका-यांसमोर वाचून तातडीने समस्या दूर करण्याची मागणी केली. यात आचरा बाजारपेठेसाठी वेगळ्या जनित्राची व्यवस्था करणे, आचरा बाजारपेठ देवूळवाडी येथील गंजलेल्या जनित्रामुळे कर्मचारी, ग्रामस्थांना असलेला धोका , कामासाठी बाजारपेठेतील लाईन बंद करताना दुपारी मधल्या वेळेत केली जावी, वीज थकबाकी बिलाबाबत वीज जोडणी तोडण्याची कारवाई करण्याअगोदर संबंधित ग्राहकांना कल्पना देणे आदी बाबींबाबत ववीजमंडळ अधिकारयांना सजग करण्यात आले. याबाबत सहाय्यक अभियंता पाटील यांनी या बाबत पाठपुरावा सुरू केला असून सध्या उद्भवत असलेली समस्या ही आचरा सबस्टेशन फिडर मध्ये बिघाडामुळे निर्माण झाली असून शनिवारपर्यंत ती दुरुस्त केली जाणार असल्याचे सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स