ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेले लोकाभिमुख कार्य करायचा संदेश पारकर यांचा मानस...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेले लोकाभिमुख कार्य करायचा संदेश पारकर यांचा मानस...!

प्रकाशन: 17 Nov 2021 08:10 PM
वाचन संख्या 34

स्मृतिदिनी शिवसैनिकांनी केले मनोभावे बाळासाहेबांना अभिवादन…!

कणकवली | उमेश परब : हिंदूहृदयसम्राट तथा शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांना मनोमन मानणारे आम्ही शिवसैनिक आहोत. जनतेवर होणार्‍या अन्यायाविरोधात लढा देणे हा शिवसैनिकांचा बाणा असून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले लोकाभिमुख कार्य तुम्ही-आम्ही एकत्रिरित्या करूया आणि शिवसेनाप्रमुखांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवूया, असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या जुन्या शाखेत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून शिवसेनेच्या स्थानिक नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांनी अभिवादन केले. या प्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत-पालव, अनिल हळदिवे, नगरसेवक कन्हैया पारकर, सुशांत नाईक, अ‍ॅड. हर्षद गावडे, अनुप वारंग, भालचंद्र दळवी, कणकवली शहरप्रमुख शेखर राणे, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, आशियेच्या माजी सरपंच रश्मी बाणे, संजना कोलते, शोभा बागवे, दिव्या साळगावकर, रुपेश आमडोसकर, विलास गुडेकर, सुशांत दळवी, ललिल घाडीगांवकर, कलमठचे माजी सरपंच निसार शेख, कलमठचे ग्रा.पं. सदस्य बाळू मेस्त्री, रोहित राणे, रिमेश चव्हाण, दीपक गुरव, मंगेश सावंत, सुदाम तेली, बाळू पारकर, दामू सावंत, दादा भोगले, काका राणे, योगेश मुंज, दया कुडतरकर, शरद सरंगले, राजू राणे, महेश आदीसह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेनाप्रमुखांना वंदन करत शिवसैनिकांनी त्यांना अभिवादन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स