कणकवलीचे आराध्य दैवत श्री देव स्वयंभू देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला..!
कणकवली / उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे आराध्य दैवत श्री देव स्वयंभू देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणार आहे. नवसाला पावणारा व हाकेला धावणारा म्हणून श्री स्वयंभू देवाची ख्याती सर्वत्र आहे. या जत्रोत्सवात जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दिनांक १८ नोव्हेंबर रोजी हा जत्रोत्सव होत असून सकाळपासून भाविकांची अलोट गर्दी लाभत असलेले हे मंदिर आहे. या दिवशी सकाळी विधिवत देवाची पूजा त्यानंतर धार्मिक विधी व कार्यक्रम सायंकाळी तरंग पालखी सह प्रदक्षिणा व रात्रौ श्री दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्य प्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमासोबत नवस बोलने व नवस फेडणे आदी कार्यक्रम या मंदिरात होणार आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा जत्रोत्सव साजरा होणार असून या उत्सवास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री देव स्वयंभू रवळनाथ मंदिराच्या व ग्रामस्थांच्या वतिने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)