ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबीर

कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबीर

प्रकाशन: 15 Nov 2021 08:22 PM
वाचन संख्या 54

कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळाचे आयोजन.

मंडळाच्यावतीने प्रतिवर्षी अनेक सामाजिक उपक्रम होतात आयोजित..!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सामाजीक कार्यकर्ते कै. सत्यविजय भिसे यांचा १९ वा स्मृतीदिन सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांद्वारा साजरा करण्यात येत आहे. त्यातील एका उपक्रमाअंतर्गत शिवडाव येथील कै.सत्यविजय भिसे मित्रमंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
गेली १९ वर्षे कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून अनेक सेवाभावी व सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये रक्तदान शिबिर, वारकरी संप्रदायाच्या वारकरी मंडळींचे सत्कार, रुग्णांना फळं वाटप आदी कार्यक्रम घेतले जातात. या वर्षी सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता बाळा भिसे निवास,शिवडाव येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरास सर्व रक्तदात्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स