श्री देव भोगनाथ मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव १८ नोव्हेंबर रोजी होणार संपन्न..
कणकवली | उमेश परब : कळसुली गावचे ग्रामदैवत श्री देव भोगनाथ मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव १८ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. त्रिपुरारी पूर्णिमेच्या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात हा जत्रोत्सव साजरा होणार आहे. त्रिपुरारी पूर्णिमेच्या दिवशी सकाळी श्री देव भोगनाथ व श्री दिर्बा देवी मंदिरात सकाळी धार्मिक विधींसह या जत्रोत्सवास सुरवात होणार आहे. सकाळी देवांची विधिवत पूजा त्यानंतर धार्मिक कार्यक्रम रात्री दशावतारी नाटक असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या भोगनाथ मंदिरात जत्रोत्सवात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील तसेच चाकरमानी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी होतात. या वर्षी कोरोनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा होणार असून या जत्रोत्सवास सर्व भविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कळसुली ग्रामस्थांच्या वतिने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)