ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवली पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे १७ नोव्हेंबर रोजी होणार उदघाटन..

कणकवली पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे १७ नोव्हेंबर रोजी होणार उदघाटन..

प्रकाशन: 15 Nov 2021 01:57 PM
वाचन संख्या 67

केंद्रीयमंत्री नाम.नारायण राणे राहणार उद्घाटन सोहळ्याला उपस्थित

कणकवली | उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : पंचायत समिती कणकवलीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उदघाटन सोहळा बुधवार 17 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी साय.5.00 वाजता केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. पंचायत समिती कणकवलीच्या नूतन इमारतीचे स्वप्न ना.नारायण राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत आहे.या इमारतीसाठी सन http://localhost/news/public/uploads/2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनकडुन निधी प्राप्त झाला व सन http://localhost/news/public/uploads/2017 मध्ये सदर इमारतीचे भूमिपूजन नारायण राणे झाले व आता हे स्वप्न साकार होत आहे. पंचायत समिती कणकवली ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ज्यामध्ये पंचायत समीतीचे सर्व विभाग एकाच छताखाली येतील अशी ही पहिलीच इमारत आहे.ग्रामीण भागातील जनतेला एकाच ठिकाणी आपली प्रशासकीय कामे करता यावीत त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत देता यावा तसेच पदाधिकारी यांना अधिकारी,कर्मचारी यांच्याशी थेट व वेळेत संपर्क साधून गोरगरीब जनतेची कामे वेळेत पूर्ण करता यावीत या उद्देशाने या प्रशासकीय इमारतीची रचना करणेत आलेली आहे.पंचायत समिती कणकवलीने आजपर्यँत सर्व क्षेत्रात मोठी भरारी घेतलेली आहे.आणि यातीलच ही नवीन प्रशासकीय इमारत हा एक भाग असून यासाठी सर्व आजी ,माजी पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.आणि यांच्या सर्वांच्या प्रयत्नांतून ही भव्य प्रशासकीय इमारत आज दिमाखात उभी आहे. या उदघाटन सोहळायनिमित्त सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा ,1 वाजता आरती 1.30 महाप्रसाद, साय.5 वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाटन,6 ते 8 कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम 8.30 वाजता डबलबारी असे कार्यक्रम होणार आहेत तरी ह्या सर्व कार्यक्रमांचा लाभ तालुक्यातील सर्व लोकांनी घ्यावा असे आवाहन सभापती मनोज रावराणे व उपसभापती प्रकाश पारकर यांनी केले आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स