ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
निवृत्त देवगड तहसीलदार कै. चंद्रकांत निमणकर यांच्या स्मरणार्थ कुटुंबियांतर्फे असलदे दिवीजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

निवृत्त देवगड तहसीलदार कै. चंद्रकांत निमणकर यांच्या स्मरणार्थ कुटुंबियांतर्फे असलदे दिवीजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

प्रकाशन: 14 Nov 2021 06:48 PM
वाचन संख्या 48

कणकवली | उमेश परब : वृद्धाश्रमातील वृद्धांच्या मदतीसाठी दात्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. निराधारांसह वृद्धांची सेवा करणाऱ्या वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.अशा वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी वृद्धाश्रमाला विविध माध्यमातून मदत देण्याबरोबरच सर्वांनी वृद्धांसाठी वेळ देत त्यांच्यासोबत वेळ घालविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन देवगडचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी असलदे येथे केले
असलदे येथील स्वस्तीक फाउंडेशनच्या दिवीजा वृद्धश्रमाला निवृत्त देवगड तहसीलदार कै. चंद्रकांत निमणकर यांच्या स्मरणार्थ त्याच्या कुटुंबियांतर्फे जीवनावश्यक वस्तु नुकत्याच देण्यात आल्या. यावेळी श्रीमती सविता निमणकर, सौ. निकीता बगळे – निमणकर, सौ. संजना चिंदरकर – निमणकर, वीरेंद्र चिंदरकर, अमीत हळदणकर, वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका दीपिका रांबाडे, संदेश शेट्ये आदी उपस्थित होते. यावेळी रांबाडे यांनी श्रीमती निमणकर यांचे तुळशीचे रोपटे देऊन कृतज्ञता व्यक्त केली
यावेळी रांबाडे म्हणाल्या, वृद्धाश्रमात ३५ हून अधिक वृध्द राहत आहेत. वृद्धाच्या मार्फत त्यांची सेवा केली जाते. मात्र त्यांच्यासाठी दात्यानी पुढे यावे, वृद्धाश्रमाची सध्याची जागा अपुरी असून भविष्यात ही इमारत विस्तारीत करण्याचे नियोजन आहे त्यासाठी दात्यानी आर्थिक व इतरही मदत करावी.
यावेळी मैथिली बगळे, अनिकेत बगळे, विधी चिंदरकर आदी उपस्थित होते यावेळी धान्य, साबण, साखर, चहा पावडर, बिस्किट्स आदी वस्तू देण्यात आल्या. यावेळी श्री. बगळे यांनी आश्रमासाठी चिरे देण्याचे आश्वासन दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स