ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत किल्ले रामगड स्वच्छता मोहीम..!

दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत किल्ले रामगड स्वच्छता मोहीम..!

प्रकाशन: 14 Nov 2021 02:44 PM
वाचन संख्या 75

चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील रामगड या गांवात छत्रपतींनी बांधलेल्या किल्ल्यामुळे गांवाला रामगड असे संबोधले जाते.
छत्रपतींचा रामगड येथील हाच ठेवा जपण्यासाठी काही वीरांनी एक उपक्रम राबवला. आजची पिढी ही महाराष्ट्र राज्यातील गड आणि किल्ल्यांचा ठेवा जपण्यासाठी उत्सुक असते. काही अनुभवी इतिहास व पर्यावरण जाणकारांचीही त्यांना साथ लाभते. मग हे सगळे मिळून गड,किल्ले आणि दुर्गांच्या स्वच्छता व डागडुजी मोहीमा आखून त्या राबवतात.
दुर्गवीर प्रतिष्ठान ही अशीच एक किल्ले जपण्यासाठी धडपडणारी एक इतिहासस्फूर्त संस्था आहे. हे प्रतिष्ठान महाराष्ट्रातील दुर्गम व थोड्या अल्पपरिचित किल्ल्यांवर गडकिल्ले संवर्धनाचे काम करते.सिंधुदुर्ग जिल्हात रामगड, भगवंतगड आणि यशवंतगडावर श्रमदानाच्या माध्यमातून काम करते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हासुरकर, उपाध्यक्ष अजित राणे, अर्जुन दळवी, रवींद्र रावराणे, प्रशांत डिंगणकर, प्रभाकर परब, रोहित बालाडे, धीरज राणे, राकेश इंदुलकर, सिध्देश मेस्री, मयुर विचारे, यांच मार्गदर्शन त्यांना लाभते. काल शनिवारी दुर्गवीर प्रतिष्ठानने शनिवार दिनांक 13 नोव्हेंबरला किल्यांची श्रमदान मोहिमेतून साफसफाई केली गेली.
मंदार सरजोशी, मिलिंद चव्हाण, तुषार चव्हाण, चेतन घोणे, सुबोध चव्हाण, मंदार कोयंडे, प्रणय चव्हाण, राज मालोंडकर, संकेत परब, सहना प्रभूदेसाई, ग्रिष्मा साटम, प्रिती खरात यांनी या रामगड मोहीमेत श्रमदान केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स