हळवल येथील श्री. मारुती राऊळ कालवश.
कणकवली | प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील हळवल येथील रहिवासी निवृत्त महावितरण कर्मचारी श्री. मारुती लक्ष्मण राऊळ ( वय ६७ वर्षे ) यांचे रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी पहाटे ३.०० च्या सुमारास दुःखद निधन झाले. शांत स्वभाव आणि शिस्तप्रिय म्हणून हळवल पंचक्रोशीत राऊळ यांची ओळख होती त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना नातवंडे, मुलगी,जावई असा परिवार आहे. हळवल उपसरपंच अरुण राऊळ यांचे ते वडील होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)