ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा येथे सोमवारी श्री विठोबाची जत्रा.

बांदा येथे सोमवारी श्री विठोबाची जत्रा.

प्रकाशन: 14 Nov 2021 10:19 AM
वाचन संख्या 52

बांदा | प्रतिनिधी : बांदा येथिल श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि.१५ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. कार्तिकी भागवत एकादशीला दरवर्षी हा जत्रोत्सव साजरा केला जातो. या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल  मंदिरात संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५ ते ७.३० काकडआरती होईल.त्यानंतर दर्शन व तीर्थप्रसादास आरंभ होईल. सायंकाळी उत्सवमूर्तीचे मंदिरात आगमन होईल. सायं ५ ते ७ स्थानिक महिला भजनकर्मींची भजनसेवा होईल. ७ वाजता नित्य सायंआरती तर ९ वाजता श्रींचा पालखी सोहळा  आरंभ होईल. जत्रोत्सवानिमित्त आजगांवकर दशावतार नाट्यमंडळाच्या  नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर बांदा देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच मंदिरात पाडव्यापासुन दररोज पहाटे काकडआरती सोहऴा सुरु असून हा कार्यक्रम शुक्रवार दि.१९ पर्यंत सुरु राहणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स