चेंबूर (पूर्व) येथे जनश्री फाउंडेशन तर्फे बालदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
जनश्री फाउंडेशन आहे एक बहुउद्देशीय सामाजिक निःस्वार्थी सेवा संस्था..
मालवण | सहिष्णू पंडित : मुंबईतील जनश्री फाउंडेशन या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत बालदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
14 नोव्हेंबर, म्हणजे बालदिनानिमित्त आयोजीत हे रक्तदान शिबीर चेंबूर पूर्व येथील श्री. छत्रपती शिवाजीमहाराज स्मारकानजिक , शिवसेना शाखा क्रमांक 146,पांजरपोळ या ठिकाणी संपन्न होणार आहे. पल्लवी ब्लड बॅन्क, गोवंडी यांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे.
कोरोनाचा काळ व सध्याची एकंदर सामाजिक आरोग्याची स्थिती पहाता रक्ताची गरज ही मोठ्या प्रमाणावर आहे हेच ओळखत जनश्री फाउंडेशनने ह्या समाजदायित्वाच्या उपक्रमाची बालदिनानिमित्त आखणी केली आहे . रविवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 09:00 ते दुपारी 03:00 असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले आहे.
अधिक माहितीसाठी सौ.ग्रीषा नवेले (8425910251),श्री.नवनाथ कल्हाटकर (9821949504), श्री.किशोर भाऊ माधव (7900170572) आणि श्री.चेतन राणे (9834897249) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. बालदिनाचे औचित्य व रक्ताची सामाजिक गरज या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांनी रक्तदानाच्या कार्यात सहभाग घ्यावा असे आयोजकांतर्फे आवाहन स्वरुपांत सांगितले गेले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)