ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे कुडाळात दणदणीत स्वागत..!

पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे कुडाळात दणदणीत स्वागत..!

प्रकाशन: 14 Nov 2021 01:28 AM
वाचन संख्या 125

पद्मश्रींसाठी विशेष रॅलीचे केले गेले जल्लोषात आयोजन…!

खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी केला नागरी सत्कार

ब्युरो न्यूज | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील लोककलावंत परशुराम गंगावणे यांना नुकतेच माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले गंगावणे हे जिल्ह्यातील पाहिले लोककलावंत आहेत.याबद्दल आज कुडाळ येथे त्यांची स्वागत रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते परशुराम गंगावणे यांना पुष्पहार घालून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
आदिवासी लोककलेची वृद्धी व्हावी यासाठी जिल्हा नियोजन मधून परशुराम गंगावणे यांच्या कला आंगण संस्थेला 25 लाख रुपयांची मदत पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्यावतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण,कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, समन्वयक सुशील चिंदरकर,पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, दिनेश गोरे,सचिन काळप, रूपेश पावसकर,राजू गवंडे, मंजू फडके,चेतन पडते, संतोष अडुळकर आदी उपस्थित होते.
एका मातीशी निगडीत लोककलावंताचा हा सन्मान अवघ्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक सुवर्ण सन्मानाचाच सण असल्याचे जिल्ह्यातील स्वतच स्तरांत बोलले जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स