ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठानचे आदर्शवत कार्य! ; सुरेश बांदेकर यांचे प्रतिपादन

श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठानचे आदर्शवत कार्य! ; सुरेश बांदेकर यांचे प्रतिपादन

प्रकाशन: 13 Nov 2021 05:40 PM
वाचन संख्या 167

मसुरे | सौ .प्राजक्ता पेडणेकर : श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठान व या गावचे सुपुत्र आनंद मालाडकर यांनी चांगले उपक्रम गावात राबविण्यास सुरवात केली आहे. अनेक गरजूंना प्रत्यक्ष मदत यांच्या माध्यमातून पोहोचत आहे. शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याच्या उपक्रमातून शैक्षणिक भान सुद्धा उपरोक्त प्रतिष्ठानने जपले आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा यांच्या कार्याचा आदर्श आपल्या भावी जीवनात घेऊन सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगेचे उपाध्यक्ष सुरेश बांदेकर यांनी येथे केले.
श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठान व आनंद मालाडकर यांच्या मार्फत श्री भगवती हायस्कुल व वीणा सुरेश बांदेकर ज्यू. कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

Article image

प्रतिष्ठानच्या सल्लागार सौ साक्षी गुरव यांनी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत भविष्यात कुठल्याही विद्यार्थ्याचे परिस्थिती अभावी शिक्षण थांबू नये यासाठी प्रयत्न राहतील असे सांगितले. यावेळी प्र. मुख्याध्यापक प्रसाद बागवे, पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत, पत्रकार विश्वास मुणगेकर,सदस्य अंजली सावंत, रविना मालाडकर, सौ सायली बागवे आदी उपस्थित होते.यशस्विनी प्रतिष्ठान पुरस्कृत व श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पाचवीतील विध्यार्थी दक्षेस गुरुप्रसाद मांजरेकर याने बिडीएस परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीमती एम. बी. कुंज, सौ गौरी तवटे, एन. जी. वीरकर, बाबाजी सावंत, झुंजार पेडणेकर, गुरुप्रसाद मांजरेकर, प्रियांका ठाकूर, प्रियांका कासले,स्वप्नील कांदळगावकर, एन. एल. बागवे आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार सौ गौरी तवटे तर प्रास्ताविक प्रसाद बागवे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स