ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वेंगुर्लेत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते दीपज्योती नमोस्तुते २०२१ चे उद्घाटन संपन्न..

वेंगुर्लेत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते दीपज्योती नमोस्तुते २०२१ चे उद्घाटन संपन्न..

प्रकाशन: 13 Nov 2021 04:08 PM
वाचन संख्या 63

ब्युरो न्यूज | विवेक परब : वेंगुर्ले – दीपावली सणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या दीपज्योति नमोस्तुते दिव्य दिवाळी उत्सव २०२१ या कार्येक्रमाचे उदघाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वेंगुर्ले कॅम्प येथील नगरपालिकेच्या नव्याने विकसित केलेल्या त्रिवेणी संगम उद्यान येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले.यावेळी खास उपस्थिती असलेले सिनेअभिनेते व मालवणी हास्यसम्राट दिगंबर नाईक यांच्या विनोदी भाषणाने व कार्येक्रमाच्या सुरवातीला घातलेल्या मालवणी गाऱ्हाण्याने उपस्थित रसिक भारावून गेले. यावेळी बोलताना दिगंबर नाईक म्हणाले की कोकणी माणसाचा मन ह्या सगळ्या रंगानी भरलेला असता. त्येका खायचो वेगळो रंग दिवची गरज नाय. कोकणी माणूस हे नेहमी कलावंतांच्या कलेक आवर्जून दाद दिततच. या दरम्यान त्यांनी नगरपालिकेच्या क्रॉफर्ड मार्केट विषयी व नगरपालिकेच्या वेगवेगळ्या उपक्रमांबाबत गौरवोद्गार काढले.
यावेळी उदघाटन भाषणात राजन तेली म्हणाले की, ताज सारखे प्रकल्प आपल्याकडे येताहेत आणि असे अनेक प्रकल्प यायलाच पाहीचे परंतु ते नुसते येऊन चालणार नाहीत तर त्याचा काहीतरी स्थानिकांना फायदा झाला पाहिजे. सुधारणा आणि स्थानिकांना त्याचा फायदा होईल असे काहीतरी करून दाखवावे म्हणजे खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल असेही ते म्हणाले.
तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असलेला दिव्य दिवाळी उत्सव या कार्येक्रमासाठी वेंगुर्ले कॅम्प येथील नगरपालिकेच्या त्रिवेणी संगम उद्यानात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली आहे.
यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, रत्नागिरी – सिंधुदुर्ग संघटन मंत्री शैलेंद्रजी दळवी, यांच्या सह
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , उपनगराध्यक्षा शीतल आंगचेकर, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण , नगरसेविका श्रेया मयेकर,नगरसेवक प्रशांत आपटे,महिला ता.अध्यक्षा स्मिता दामले,ता.सरचिटणीस श्री बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , नगरसेवक धर्मराज कांबळी , नगरसेविका क्रुपा गिरप-मोंडकर , जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व साईप्रसाद नाईक , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , परबवाडा सरपंच पपु परब , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर – वृंदा मोर्डेकर – रसीका मठकर – आकांक्षा परब , युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर , कमलेश गावडे ,आय.टी.सेलचे केशव नवाथे , रविंद्र शिरसाठ , किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळु प्रभु आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्येक्रमादरम्यान भाजपने आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. व त्यानंतर दीपावली शो टाईम अंतर्गत आयोजित केलेल्या ” अनिता कराओके ” कार्येक्रमाला सुरुवात झाली.यावेळी वेंगुर्लेवासीयांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काका सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन वसंत तांडेल यांनी केले .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 303

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स