ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चाफेड येथील जागृत ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिरात १७ नोव्हें. रोजी अखंड हरिनाम सप्ताह

चाफेड येथील जागृत ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिरात १७ नोव्हें. रोजी अखंड हरिनाम सप्ताह

प्रकाशन: 13 Nov 2021 11:51 AM
वाचन संख्या 136

शिरगाव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड-गावठण येथील जागृत ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिरात बुध. दि.१७ नोव्हे.रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यादिवशी सकाळी पुरोहिताकरवी पूजाअर्चा करून हरिनाम सप्तहाला सुरुवात होते. दिवसभर गावातील ग्रामस्थांची भजने सादर होतात. रात्रौ ९ वाजल्यापासून दशक्रोशीतील नामवंत भजने,दिंड्या,मेळावे आपली भजने सादर करून हरिनामाचा आनंद लुटतात. यावेळी बहुसंख्याने भाविक उपस्थित रहातात.
चाफेड गावचे जागृत अशी श्री गांगेश्वर-रासाई ही दोन आकर्षक देवालये घनदाट वनराईत वसलेली आहेत.अतिशय पुरातनकालीन ही दोन देवालये असून भाविकांच्या नवसाला पावणारी अशी त्यांची ख्याती आहे.याठिकाणी निसर्गरम्य परिसर आणि शांततामय वातावरणामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे मन प्रसन्न होऊन जाते.तरी या अखंड हरिनाम सप्तहाला सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.गांगेश्वर-रासाई देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ चाफेड यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स