ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांनी केली कुडाळ येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा..!

आमदार वैभव नाईक यांनी केली कुडाळ येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा..!

प्रकाशन: 13 Nov 2021 09:29 AM
वाचन संख्या 60

ब्युरो न्यूज | विवेक परब : राज्यभर सुरु असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल कुडाळ एस. टी. डेपोमध्ये भेट देऊन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. आ. वैभव नाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून एस. टी. कार्मचाऱ्यांचे आंदोलन थांबविण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, शहर प्रमुख संतोष शिरसाट, सचिन काळप, राजू गवंडे आदीसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स