ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
भुईबावडा घाटमार्ग बंद पडणार नाही यासाठी मास्टर प्लॅन आवश्यक:कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भुईबावडा घाटमार्ग बंद पडणार नाही यासाठी मास्टर प्लॅन आवश्यक:कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील

प्रकाशन: 07 Aug 2021 10:36 PM
वाचन संख्या 63

भुईबावडा घाटाची केली पाहणी…!

कणकवली | उमेश परब : तळकोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा भुईबावडा हा महत्त्वाचा घाट मार्ग आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पावसाळ्यात या घाटमार्गावर रस्ता खचणे व दरड पडण्याचे प्रकार वाढले आहेत. अतिवृष्टीमुळे रस्ते खचण्याच्या घटना भविष्यात घडू नयेत. म्हणून त्याचा मास्टर प्लॅन तयार करा, अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. मंत्री पाटील यांनी शनिवारी भुईबावडा घाटाची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्ता खचण्याच्या घटना घडत असल्याने रस्त्याच्या बाजूने सुरक्षा कठडे, काँक्रिटीकरण करण्याबरोबरच रस्त्याचेही काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार संगमेश कोडे, वैभववाडी तहसीलदार रामदास झळके, वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता श्री. कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, उदय देसाई, गगनबावडा सभापती संगीता पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, पंचायत समिती सदस्या मंगल कांबळे, पांडुरंग भोसले, सरपंच दगडू भोसले, सहदेव कांबळे, चंद्रकांत खानविलकर, संभाजी पाटणकर, सार्वजनिक बांधकाम अधिकारी सारिका कुलकर्णी-जाधव, विभागीय वन अधिकारी सुधीर सोनवणे, विभागाचे कार्यकारी अभियंता संजय काटकर, गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, पी.डी.जाधव, बंडाआप्पा पडवळ, दादू पाटील आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स