ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कणकवलीत २० नोव्हेंबर रोजी किलबिल जल्लोष
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवलीत २० नोव्हेंबर रोजी किलबिल जल्लोष

प्रकाशन: 09 Nov 2021 01:23 PM
वाचन संख्या 108

समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन

कणकवली । उमेश परब : बालदिनाचे औचित्य साधत येत्या २० नोव्हेंबर रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे लहान मुलांसाठी एक दिवस किलबिल जल्लोष या खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच कणकवलीत आयोजन करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता खाऊ गल्लीचे उदघाटन होणार आहे. पुणे येथील गायक सौरभ दफ्तरदार यांची गाण्याच्या मैफिलचा नजराणा पेश केला जाणार आहे. लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी, थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जादूगार सुचित्रा इंदुलकर यांचे जादूचे खेळ हे खास आकर्षण असणार आहे. खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना सरप्राईज गिफ्ट मोफत देण्यात येणार आहे. यावेळी बांधकाम सभापती ऍड. विराज भोसले, आरोग्य सभापती संजय कामतेकर, नगरसेवक अभि मुसळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, चारू साटम, राजू गवाणकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स