ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवण तालुक्यातील पेंडूर येथे शेतकरी मासिक वाचन सप्ताह कार्यक्रम..!

मालवण तालुक्यातील पेंडूर येथे शेतकरी मासिक वाचन सप्ताह कार्यक्रम..!

प्रकाशन: 09 Nov 2021 02:24 PM
वाचन संख्या 40

मालवण तालुका कृषी विभागाचे अनोखे आयोजन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने दिनांक ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शेतकरी मासिक वाचन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने मालवण तालुका कृषी विभागाच्या वतीने मौजे खरारे-पेंडूर ग्रामपंचायत येथे शेतकरी मासिक वाचन सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी, सरपंच श्रीम.सुनिता मोरजकर, सदस्य सुनिल सावंत, कृषी सहा. श्रीम.मनिषा गिते, आत्मा व्यवस्थापक श्री.निलेश गोसावी तसेच महिला शेतकरी उपस्थित होत्या.यावेळी उपस्थितांना श्री.विश्वनाथ गोसावी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
शेतकरी मासिक मधील प्रसिद्ध लेख बाबत माहिती देण्यातआली.बीजप्रक्रिया,पिक संरक्षण,पिक लागवड पद्धत, प्रक्रिया उद्योग, तसेच विविध राबविले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी माहिती गोसावी यांनी दिली.
क्रुषि विभागाच्या संकेतस्थळावर (www.krishi.maharashtra.gov.in) देखील शेतकरी मासिक प्रसिध्द केले जाते.प्रसिध्द यशोगाथा नाविन्यपूर्ण उपक्रम यांच्या वाचनाने त्यातून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल तसेच त्यातून शेतकरी मासिकाचा उद्देश सफल होईल.याकरीता विविध स्तरांवर शेतकरी मासिक वर्गणीदार करून घेण्यात येणार असल्याचे यावेळी तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स