ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदी दोडामार्ग तालुक्यातील डाॅ. बाबासाहेब राणे यांची नियुक्ती.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदी दोडामार्ग तालुक्यातील डाॅ. बाबासाहेब राणे यांची नियुक्ती.

प्रकाशन: 09 Nov 2021 11:30 AM
वाचन संख्या 104

ब्युरो न्यूज | विवेक परब : भाजपा किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी उपाध्यक्ष पदी डाॅ. बाबासाहेब राणे ( दोडामार्ग ) यांची निवड जाहीर केली .
कुडाळ विश्रामगृहात रविवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी किसान मोर्चाच्या प्रमुख पदाधिकारी बैठक आयोजित केली होती , यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा किसान मोर्चा चे संयोजक प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब राणे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले .
यावेळी किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी घेण्यात येणारया उपक्रमांची चर्चा करण्यात आली . तसेच आगामी काळात ” पाणी अडवा – पाणी जिरवा ” हा बंधारे घालण्याचा कार्यक्रम किसान मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये करण्याचे नियोजन करण्यात आले . तसेच लवकरच जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी सभापती राजेंद्र म्हापसेकर यांची भेट घेऊन जि.प.च्या योजना किसान मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरयांना पोहचवण्यासाठीचा कृती आराखडा बनविण्यात आला. तसेच किसान मोर्चा च्या माध्यमातून कृषी औजारांची बॅंक प्रत्येक तालुक्यामध्ये करण्याचे ठरविण्यात आले .
  यावेळी या बैठकीला किसान मोर्चा चे सरचिटणीस गुरुनाथ पाटील ( कुडाळ ) – राजेश माळवदे ( कणकवली ) – प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु ( वेंगुर्ले ) , जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे  ( मालवण ) ,  चिटणीसअजय सावंत ( माझगांव – सावंतवाडी ) , जिल्हा महिला संयोजक सौ.दिपा काळे ( कुडाळ ) – सौ.अपर्णा बोवलेकर ( वेंगुर्ले ) , तालुकाध्यक्ष महेश रामदास संसारे  ( वैभववाडी ) – वामन निळखंठ राऊळ ( कुडाळ ) – महेश सारंग ( मालवण ) – यशवंत उर्फ बापु पंडित ( वेंगुर्ले ) , जेष्ठ पदाधिकारी हरीभाऊ केळुसकर ( मालवण ) , यशवंत धर्णे  ( दोडामार्ग ) इत्यादी उपस्थित होते बैठकीचे सुत्रसंचालन सरचिटणीस राजेश माळवदे यांनी केले .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स