ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवलीत छत्रपती शिवरायांसाठी सर्व नेते एकाच व्यासपीठावर....!

कणकवलीत छत्रपती शिवरायांसाठी सर्व नेते एकाच व्यासपीठावर....!

प्रकाशन: 08 Nov 2021 04:04 PM
वाचन संख्या 144

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना उतरली सत्यात..!

कणकवली | उमेश परब :कणकवली शहरातील महामार्गावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर निर्णय घेण्याबाबत आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे.या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, आ.नितेश राणे, आ.वैभव नाईक,माजी आ.परशुराम उपरकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिले आहेत.
कणकवली नगरपंचायत भालचंद्र महाराज सभागृहात लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना प्रतिनिधी, कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, मराठा समाज प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,सुशांत नाईक,जिल्हा प्रशासन अधिकारी जयंत जावडेकर,अबिद नाईक,प्रभारी तहसीलदार प्रिया परब,डॉ.विद्याधर तायेशेट्ये,अशोक करबळेकर,व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर, सुशील सावंत,अण्णा कोदे, समीर सावंत,महेश सावंत,सुशील सावंत,बबलू सावंत,भाई परब,आनंद पारकर,गटनेते संजय कामतेकर,नगरसेवक अभिजित मुसळे,कन्हैया पारकर,विराज भोसले,महेश तेली,किशोर राणे,मनोज हिर्लेकर,प्रितम म्हापसेकर,अनंत पारकर,राजेंद्र पेडणेकर,शैलश भोगले, राजु राठोड,रिमेश चव्हाण, अजय गांगण,संतोष सावंत,शेखर राणे,अनिल हळदिवे,मिलींद मेस्त्री आदींसह नागरिक उपस्थित आहेत.


नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरपंचायत पदाधिकारी यांनी सर्वांचे स्वागत केले आहे.आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर मुद्द्यांवर चर्चा सुरुवात झाली आहे.नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रस्तावना केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स