सामान्य नागरिकांना न्याय मिळत नसेल तर कार्यालयाला टाळे ठोकणार : सुजित जाधव.
वीज कनेक्शन साठी कलमठ गांवच्या श्री प्रकाश गांवकर यांना मिळतेय तारीख पे तारीख…!
शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी दिला वीज वितरण विभागाला सज्जड इशारा..
कणकवली | प्रतिनिधी : मानवाला अन्न,वस्त्र व निवारा यासोबतच मनुष्याला आवश्यक असणारी गरज म्हणजे वीज नवीन बांधलेल्या घरात वीज नसेल तर आणि हीच वीज मिळवण्यासाठी वीज वितरण विभागाच्या दारी हेलपाट्या माराव्या लागत असतील आणि तरीही वीज मिळत नसेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाजवळ मागावा ? कणकवली तालुक्यातील कलमठ येथील रहिवासी प्रकाश गंगाराम गांवकर यांची अशीच परिस्थिती आहे. अथक मेहनत आणि स्वतःची मिळकत यातून नवीन उभारलेल्या घरात नवीन वीज कनेक्शन मिळावं म्हणून वारंवार वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांजवळ हेलपाटे मारावे लागत आहेत. कलमठ ग्रामीण विभाग अभियंत्यांनी वारंवार तारीख पे तारीख देत चाल ढकल करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप गावकर यांनीं केला आहे. वारंवार मागणी करून न्याय न मिळालेल्या गावकर यांनीं सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांची भेट घेतली. यावर सुजित जाधव यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून गांवकर यांना वीज कनेक्शन मिळावे यासाठी प्रयत्न केले मात्र तिथेही न्याय न मिळाल्याने अखेर गावकर यांनी अभियंता कलमठ विभाग यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रारी नंतर गावकर यांना न्याय मिळाला नाही तर कलमठ येथील वीज वितरण कार्यालयाला कुलुप घालणार असल्याचा इशारा सुजित जाधव यांनी दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)