ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हाॅस्पिटलमध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेल्यांना सरकार जबाबदार असल्याची परशुराम उपरकरांची जळजळीत टीका..!

हाॅस्पिटलमध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेल्यांना सरकार जबाबदार असल्याची परशुराम उपरकरांची जळजळीत टीका..!

प्रकाशन: 08 Nov 2021 02:59 PM
वाचन संख्या 51

रुग्णालयांची इलेक्ट्रिक ऑडिट का होत नाहीत असा जळजळीत सवाल….!

मनसे सरचिटणीसांनी ठेवलेय सरकारच्या कार्यक्षमतेवर बोट..!

कणकवली | उमेश परब : सावित्री नदीत अनेकांचे बळी गेले ,त्यानंतर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सरकारने घोषणा केली.तरीही मल्हार पुल कोसळला, मग ते ऑडिट कागदावरच झाले होते का? कोविड काळात अनेक हॉस्पिटलमध्ये आग लागल्यानंतर रुग्णालयात इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासाठी घोषणा राज्य सरकारने केली, त्याचे काय झाले?आता अहमदनगरमध्ये हॉस्पिटल मध्ये अनेकांचे बळी गेल्यानंतर ५ लाख मदत जाहीर केली. मात्र होरपळून मृत्युमुखी पडले,त्याला ऑडिटकडे दुर्लक्ष केल्याने सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला.
शेती नुकसान भरपाई ,तोक्ते वादळाचे अनेकांना अद्याप पैसे मिळाले नाहीत.रस्त्याची अवस्था काय आहे?खड्डेमय रस्ते आहेत.आमदार,खासदार घोषणा करत आहेत.अनेक कामगारांचे पगार मिळत नाहीत,अधिकाऱ्यांचे पगार मिळत नाही.एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे मिळत नाहीत.ग्रामीण भागात जाण्यासाठी एकमेव साधन एसटी लोकांना परवडणारे आहे.सत्तेवर आल्यानंतर काय करु? सत्ताधारी वचननामा विसरुन काम करताना दिसत आहेत.जनतेला न्याय देण्यासाठी सत्ताधारी अपयशी ठरले आहेत.त्यामुळेच नेते व कार्यकर्त्यांना जनतेने घोषणांचे काय झाले ?याचा जाब विचारला पाहिजे,असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले.मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शासन जनतेला फसवत आहे.कोविड काळात अनेक हॉस्पिटलमध्ये आग लागून लोकांचे जीव गेले होते,त्यावेळी
स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सरकारने दिले होते.तरीही हॉस्पिटलमध्ये लोकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.त्यांना ५ लाख दिले गेले,कुटुंब प्रमुख गेला ती उणीव भरुन निघत नाही.त्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिक ऑडिट झाले का? शासनाकडून घोषणा करून फसवलं जात असल्याचा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स